फलटण तालुक्यात 70 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 70 corona positive
फलटण दि. 26 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 26 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 70 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 36 व्यक्ती तर ग्रामीण भागात 34 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे. आज सापडलेल्या रुग्णांची संख्या ही दिवसातील सर्वाधिक संख्या आहे.
फलटण शहरात 36 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये विद्यानगर 4, कसबा पेठ 4, मंगळवार पेठ 3, बुधवार पेठ 3, मारवाड पेठ 2, रविवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, लक्ष्मीनगर 1, गजानन चौक 1, हडको कॉलनी 1, उमाजी नाईक चौक 1,गोळीबार मैदान 1 व फलटण असा पत्ता दिलेले 13 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

ग्रामीण भागात 34 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये साठे 5, कोळकी 5, ताथवडा 3, आदर्की 3, वडले 2, वाठार निंबाळकर 1, सांगवी 2, विडणी 2, धुळदेव 1, नांदल 1, जाधवाडी 2, वाखरी 1, साखरवाडी 1, कुरवली 1, राजुरी 1, फडतरवाडी 1, गुणवरे 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे. https://www.gandhawarta.com/
No comments