आम्ही नाही .... ड्रग्ज घेत - श्रद्धा कपूर व सारा अली खान

गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 26 सप्टेंबर 2020) - श्रद्धा कपूर व सारा अली खान यांची अमली पदार्थ विरोधी पथकाकडून चौकशी करण्यात आली. विविध वृत्तवाहिन्यांच्या वृत्तानुसार एनसीबीला सारा अली खान हिने स्वतः कधीही ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे संगितले असून, सुशांत सिंह राजपूत सोबत रिलेशनशिप मध्ये होती, आणि ती व सुशांत हे 5 दिवस थायलंड येथे वास्तव्यासाठी होते. तसेच शूटिंग दरम्यान सुशांतच्या घरी देखील राहिली होती असे साराने संगितले. सुशांतसोबत पार्ट्यांमध्ये सहभागी होत असल्याचेही तिने मान्य केले. मात्र आपण कधीही ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे सारा ने संगितले आहे.
वृत्तवाहिन्यांच्या वृत्तानुसार श्रद्धाने कपूर ने एनसीबीला, सुशांतसोबत पार्टी केल्याचं संगितले आहे. परंतु तिने त्या पार्टीत कोणत्याही प्रकारचे ड्रग्जचे सेवन केले नसल्याचं सांगितलं. तसेच पवना फार्म हाऊस येथे सुशांतच्या फार्महाऊसवर गेली होती, असेही श्रद्धा ने संगितले आहे. पवना फार्म हाऊस येथे झालेल्या पार्टीत ड्रग्जचा वापर झाला होता, मात्र मात्र आपण कधीही ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे श्रद्धाने एनसीबीला सांगितले.
No comments