Breaking News

एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी गायलेले मराठी गीत

 

         गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 26 सप्टेंबर 2020) - प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं दि. 25 सप्टेंबर 2020 रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली. पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, तसेच सामाजिक राजकीय, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांसह अनेक सिने सृष्ठीतील कलाकारांनी बालसुब्रमण्यम यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. 

          बालसुब्रमण्यम यांच्या  आवाजाची वेगळीच जादू प्रक्षेकांनी आणि रसिकांनी अनुभवली आहे. पत्थर के फूल, हम आप के है कौन, बागी, साजन, रोजा अशा अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत.हिंदीसह तमीळ, तेलुगु, मल्याळम आदी भाषांत चाळीस हजारांहून अधिकगाणी गायली आहेत. 

        पत्रकार सूरज बोरवके तसेच अभिनेता सुमीत राघवन यांनी बालसुब्रमण्यम श्रद्धांजली वाहत,  त्यांनी गायलेल्या मराठी गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.  हा व्हिडीओ शेअर करत ‘अप्रतिम… केवळ अप्रितम’ असे म्हणत अभिनेता सुमीत राघवन  यांनी बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बालसुब्रमण्यम यांनी गायलेले ते  मराठी गाणे आमच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करीत आहोत. 



No comments