वंचित बहुजन आघाडीच्या फलटण शहराध्यक्षपदी सपना भोसले

फलटण - वंचित बहुजन आघाडीच्या फलटण शहराध्यक्षपदी मंगळवार पेठ, फलटण येथील आघाडीच्या कार्यकर्त्यां सौ. सपना मिलिंद भोसले यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हाउपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी दिले.
सौ. सपना भोसले या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करून त्यानां न्याय देण्याचे काम केले आहे. या कामाची दखल घेऊनच त्यांची वंचित बहुजन आघाडीच्या फलटण शहराध्यक्षपदी निवड करण्यात काली आहे.
सौ. सपना मिलिंद भोसले यांच्या निवडीचे पत्र देताना जिल्हाउपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांच्या सह युथ तालुका अध्यक्ष किरण मोरे, नारायण पवार अश्विनी गायकवाड, सुलोचना पवार, किरण अहिवळे, उषा अहिवळे या सह महिला पदाधिकारी उपस्थित होते.
No comments