मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने अध्यदेश काढावा - संभाजी ब्रिगेड

The state government should issue an ordinance for Maratha reservation - Sambhaji Brigade
फलटण दि. 12 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - मराठा समाजासाठी लागू असलेले सध्याचे आरक्षण कायम ठेवण्याचे अध्यादेश राज्य सरकारने काढावेत अशी मागणी, संभाजी ब्रिगेड सातारा जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली आहे.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज फलटण येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विशाल (भैय्या) शिंदे, तालुका अध्यक्ष विनीत शिंदे, मनोज जगताप, प्रदीप घाडगे (जिल्हा सरचिटणीस) रणजीत जाबळकर, दत्तात्रय पवार,जनमजय कदम, अंजिक्य कदम, विनोद जाधव ,आशुतोष मोहिते,मयुर जगदाळे, अजित शिंदे, संग्राम साळुखे,अभिजीत कदम वैभव कापसे बजरंग भगत उपस्थिती होते.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी दिनांक ०९ सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणासाठी स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजास जबर फटका बसलेला आहे. मराठा समाज आरक्षणापासून कायम वंचित राहिलेला आहे.
मराठा समाजाच्या मागण्या आहेत की, मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय होईपर्यंत कोणत्याही स्वरूपाची शासकीय नोकर भरती करण्यात येऊ नये. मराठ्यांना लागू असलेले सध्याचे आरक्षण कायम ठेवण्याचे अध्यादेश सरकार ला काढता येतो तो सरकारने काढावा व आरक्षणाचा लाभ चालू ठेवावा. मराठा समाजास लागू असलेले सध्याचे शासकीय निमशासकीय शाळा कॉलेज मधील आरक्षणाचे लाभ कायम ठेवावे, अशा विविध मागण्यासह मागण्या मान्य नाही झाल्या तर संभाजी ब्रिगेड संपूर्ण जिल्ह्यात तिव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
No comments