देशात चोवीस तासांत ९७,५७० नवे कोरोना रुग्ण

गेल्या 24 तासात 97 हजार 570 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी एकट्या महाराष्ट्रातील 23,000 हून अधिक तर आंध्रप्रदेशातील 10,000 हून अधिक रुग्ण आहेत.

सुमारे 57 टक्के नवीन रुग्ण केवळ पाच राज्यातून आढळून आले आहेत. बरे झाले 60 टक्के रुग्ण याच राज्यातील आहेत.
देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 9,43,480 इतकी आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असून महाराष्ट्रात 2,60,000 हून अधिक तर त्यापाठोपाठ कर्नाटकात 1,00,000 हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.
एकूण सक्रिय रुग्णांपैकी 74 टक्के सक्रिय रुग्ण जास्त प्रभावित झालेल्या नऊ राज्यातील आहेत. एकूण सक्रिय रुग्णांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांचे प्रमाण 48% पेक्षा जास्त आहे.
देशभरात गेल्या 24 तासांत 1,209 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 495 मृत्यू तर कर्नाटकमध्ये 129 मृत्यू तर उत्तर प्रदेशात 94 मृत्यूची नोंद झाली आहे.
गेल्या चोवीस तासांत देशात ९७ हजार ५७० नव्या रुग्णांची नोंद झाली असून १ हजार २०१ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४६ लाख ५९ हजार ९८५ वर पोहोचली आहे. देशात सध्या ९ लाख ५८ हजार ३१६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत ३६ लाख २४ हजार १९७ रूग्णांनी उपचारानंतर करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ७७ हजार ४७२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
No comments