Breaking News

रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

 

Riya Chakraborty arrested by NCB
        मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात जेव्हापासून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) उडी घेतली आहे, तेव्हापासून या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहे. आता एनसीबीने अमली पदार्थांचं सेवन आणि त्याचा व्यवहार केल्याप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक केलं आहे.

        सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणात तिची चौकशी सुरू होती. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज रियाला अटक करण्यात आलं. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर एनसीबीने रियाला चौकशीस हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते.

No comments