73 कोरोना पॉझिटिव्ह फलटण तालुक्यात तर 2 मृत्यू

फलटण दि. 8 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 8 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार फलटण तालुक्यात आज 72 व्यक्तींच्या कोविल चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत तर दोन व्यक्ती मृत पावले आहेत यामध्ये फलटण शहरात 30 आणि ग्रामीण भागात 43 व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केलेल्या अहवालानुसार
फलटण शहरात
फलटण 10, मंगळवार पेठ 5, लक्ष्मीनगर 4, बुधवार पेठ 1, गिरवी चौक 1, गोळीबार मैदान 1, जिंती नाका 1, गवळीनगर फलटण 1, सगुनामाता नगर फलटण 1,गजानन चौक फलटण 1, रिंग रोड फलटण 1,शिवाजीनगर फलटण 1,भडकमकरनगर 1, मलटण 1 अशा 30 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात
पिप्रद 2, वाजेगाव 1, सांगवी 3, पाडेगाव 6, गोखळी 6, सस्ते 3, आसू 3, नाईक बोमवाडी 1, फरांदवाडी 1, कांबळेश्वर 1, होळ 2, जाधववाडी 1, सांगवी 1, सस्तेवाडी 1, विडणी 2, ठाकुरकी 1, राजाळे 1, कोळकी 4, जिंती 1, तरडगाव 1, भाडळी खुर्द 1 अशा एकूण 43 व्यक्तींच्या
कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
2 रुग्णांचा मृत्यू
विडणी ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, रिंग रोड फलटण येथील 90 वर्षीय पुरुष या कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
No comments