फलटण प्रांतांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

फलटण दि. 7 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - कोरोना बाधित यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच आज फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडंर शिवाजीराव जगताप यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
फलटणचे प्रांत अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, या आठवडाभरात जे त्यांच्या सहवासात आले आहेत त्यांनी काळजी घ्यावी व टेस्ट करावी असे आवाहनही उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.
फलटणचे प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी कोरोना काळात झोकून देवून काम केले आहे. ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय, कोरोना केअर सेंटर, कोव्हिड हॉस्पिटल , संस्थात्मक विलगिकरण कक्ष, अधिग्रहित केलेली रुग्णालये येथे त्यांनी समक्ष भेटी दिल्या होत्या. तसेच कोरोना काळात आरोग्य सुविधा सुलभपणे मिळाव्यात यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. कोरोना चाचणी जरी पॉझिटिव्ह आली असली तरी कोरोनाची लक्षणे आपल्यात दिसून आली नाहीत, त्यामुळे आपण होम आयसुलेशनमध्ये राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्यासारखा कर्तव्यदक्ष आधिकारी कोरोना बाधित झाल्याने गेल्या आठवडाभरात जे कोणी त्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांनी खबरदारी म्हणून कुणाच्या संपर्कात येवू नये व आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहण प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.
No comments