Breaking News

बेरोजगार उमेदवारांसाठी 15 ते 18 सप्टेंबर कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

        सातारा दि.9  :  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा यांचे मार्फत दिनांक १५, १६, १७, व १८ सप्टेंबर २०२० रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सातारा जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

         या रोजगार मेळाव्यात ट्रेनी, फिटर, वेल्डर, टर्नर, सी एन सी ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, सेल्स ऑफिसर, सेल्स एक्झिक्युटीव्ह, कुशल - अकुशल कामगार, डॉक्टर, नर्सिग स्टाफ, पेंटर, डेंटर, रिक्षा मॅकेनिक, डिप्लोमा ट्रेनी, शिट मेटल, मशनिस्ट, अॅटो मॅकेनिक, डिझेल मॅकेनिक, मोटार मॅकेनिक, विक्री प्रनिनिधी, लाईफ प्लॅनिंग ऑफिसर, टू व्हिलर मॅकेनिक, इलेक्ट्रॉनिक्स, प्लॅस्टिक प्रोसेसिंगऑपरेटर, क्वालिटी इन्स्पेक्टर, १० वी पास / नापास, १२ वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, अशा प्रकारची ९९१ रिक्तपदे १७ उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत, नोकरी इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी पुर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अॅप्लाय करावे. जेणेकरुन त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल, मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हीडीओ कॉन्फरन्स अथवा टेलीफोन याव्दारे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.

        आयोजित ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावे, याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दुरध्वनीवर अथवा satararojgar1@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे अवाहनही श्री. जाधव यांनी केले आहे.

No comments