काळज ता. फलटण येथून 10 महिन्याच्या बालकाचे अपहरण

गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 30 सप्टेंबर 2020) - काळज ता. फलटण येथून ओम अधिक भगत या 10 महिन्याच्या बालकाचे अपहरण करण्यात आले आहे. मंगळवारी दि. 29 रोजी मोटारसायकल वर आलेल्या 20 ते 25 वयोगटातील जोडप्याने या बालकास पळवून नेले असल्याची फिर्याद लोणंद पोलीस स्टेशन ला नोंद करण्यात आली आहे.
लोणंद पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार गु. रजि. नंबर ३५३/२०२० भा. द. वि.स. कलम ३६३ मधील बालक नामे ओम आदिक भगत वय १० महिने, राहणार रामनगर, काळज, ता. फलटण, जि सातारा यास दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ४.३० ते ५.१५ च्या सुमारास संशयित पुरुष अंदाजे २२ ते २५ वर्षे असून त्याने काळ्या रंगाचा शर्ट व जीन्स पॅन्ट परिधान केली होती. त्याच्या सोबत गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केलेली महिला या संशयीत जोडप्याने मोटरसायकल वर येवून सदर बालकास पळवून नेलेले आहे.
दिलेल्या फोटोतील वर्णनाचे बालक कोणास दिसुन आल्यास किंवा संशयित जोडपे मिळून आल्यास अगर त्याचे बाबत काही माहिती मिळाल्यास, तात्काळ खालील मोबाईल फोन नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन लोणंद पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे.
बालकाचे पोटावर जन्मता काळ्या रंगाचा डाग आहे. वरील बालक व आरोपी बाबत माहिती कळविणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल व त्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल.
संपर्क नंबर :
लोणंद पोलीस स्टेशन, जिल्हा सातारा नंबर - ०२१६९/२२५०३३ स. पो. नि. संतोष चौधरी, मो. ९५५२५४३५४४
स. पो. नि. महेश भाविकट्टी, मो. ९४२३४९८३१०
स. पो. नि. हनुमंत गायकवाड, मो. ९८२३७२६६००
पो. उ. नि. गणेश माने, मो. ९४२००२४११६

No comments