Breaking News

कंगनाची जीभ घसरली ; आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल - कंगना

        Kangana's tongue slipped while criticizing the Chief Minister
अभिनेत्री कंगना रणौत बुधवारी दुपारी 2.45 वाजता  मुंबईत पोहोचली. दरम्यान मुंबई विमानतळावर बराच गोंधळ बघायला मिळाला. कंगनाचे समर्थक आणि विरोधक समोरा-समोर आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी व्हीआयपी गेटऐवजी कंगनाला दुस-या गेटमधून बाहेर काढण्यात आले. येथून ती थेट तिच्या घरी पोहोचली. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव तिच्या घराबाहेर 50 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
 
        मुंबईत पोहोचताच अभिनेत्री कंगना रणौतने ट्विटरला व्हिडीओ शेअर करत मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे आज तुम्ही माझं घर तोडलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल असं कंगनाने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. 
 
        अभिनेत्री कंगना रणौतने ट्विटरला शेअर केलेल्या व्हीडिओत तिने म्हटलं आहे की, “उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं…फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडून तुम्ही बदला घेतला आहे. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. हे वेळेचं चक्र आहे, नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत. काश्मिरी पंडितांना कसं वाटतं हे मला आज कळालं. आज मी या देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्या नाही तर काश्मीरवरही चित्रपट तयार करणार. आपल्या देशवासियांना जागरुक करणार. ही क्रूरता आणि दहशतवाद माझ्यासोबत झाला हे चांगलं आहे, कारण याचा काही अर्थ आहे. जय हिंद…जय महाराष्ट्र”.

No comments