एकता कपूर यांच्यावर गुन्हा दाखल करावा - धनगर शासन संघटना

फलटण दि. 9 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - झी व अटल बालाजी या टी व्ही चॅनल च्या व्हर्जिन भास्कर नावाच्या मालिके मध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याने बदनामी झाली आहे,ती मालिका बंद करून संबंधित कंपनी व एकता कपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी धनगर शासन महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष शंभूराजे शेंडगे यांनी केली आहे.
झी व अटल बालाजी या टी व्ही चॅनल च्या व्हर्जिन भास्कर नावाच्या सिरीयल मध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने हॉस्टेल चे नाव दिले आहे व त्यातील प्रसंग दाखवला आहे. अशा प्रकारे नाव देऊन आपमन केला आहे, तरी निर्मित कंपनीवर बंदी घालावी व एकता कपूर वर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन फलटणचे तहसीलदार पाटील यांच्याकडे संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे.
No comments