Breaking News

तडीपार गुन्हेगार हद्दीत आढळले; फलटण ग्रामीण पोलीसांची कारवाई

Abroad criminals found within the limits; Phaltan Rural Police take action

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३१ जुलै २०२३ - जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार दि. ३० जुलै २०२५ रोजी संपूर्ण सातारा जिल्ह्यात “कोंबीग ऑपरेशन” राबवण्यात आले. या पार्श्वभूमीवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार गुन्हेगारांनी हद्दीत प्रवेश केल्याचे निदर्शनास येताच गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    कोंबीग ऑपरेशन दरम्यान, पोलीस ठाण्यातील तिन पथकांपैकी एक पथक सरडे गावात पहाटे २ वाजता तडीपार गुन्हेगारांची तपासणी करत असताना, तडीपार आदेश असतानाही गावात वास्तव्य करत असलेले चार इसम दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच हे चारही आरोपी पळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

    1. रोहित भिमराव जाधव (वय ३२), 2. ऋतिक दत्तात्रय जाधव (वय २३), 3. विशाल बाळासो जाधव (वय २३), 4. सुरज शिवाजी बोडरे (वय २७) सर्व रा. सरडे, ता. फलटण, जि. सातारा, या चौघांना फेब्रुवारी २०२५ मध्ये सातारा व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र त्यांनी तडीपार आदेशाची उल्लंघना केली व अनधिकृतरीत्या गावात वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
जी. बी. बदने (पो. उपनिरीक्षक), नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, हनुमंत दडस, अरुंधती कर्णे यांनी कारवाईत सहभाग घेतला होता, पुढील तपास पो. हवा. अमोल जगदाळे हे करत आहेत.

No comments