Breaking News

मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे? - कंगनाच्या प्रश्नाला रेणुकाचे मराठी ठसक्यात उत्तर

 

कंगना आणि रेणुका यांची ट्विटरवर खडाजंगी

        मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने सोशल नेटवर्किंगवरुन संताप व्यक्त केला जात आहे. याच वक्तव्यावरुन आता कंगनाला अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सुनावलं आहे. 
         शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली आहे. कंगनाच्या या टीकेला उत्तर देताना रेणुका शहाणे यांनी ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला‘ म्हणत सणसणीत उत्तर दिलं आहे. मात्र त्यावरही कंगनाने उत्तर दिल्याने रेणुका यांनी पुन्हा कंगनाला ‘मला मुंबईची पीओकेशी केलेली तुलना आवडली नाही,’ असं स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे.

        'मला मूव्ही माफिया आणि गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, प्लीज,' असं तिनं म्हटलं होतं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तिच्यावर कडक शब्दांत टीका केली होती. 'मुंबईत भीती वाटत असेल तर आणि कोणाला इतर राज्यांची सुरक्षा हवी असेल तर चंबूगबाळे आवरून निघून जावं,' असं त्यांनी सुनावलं होतं. त्यावर  राऊत यांच्यावर टीका करताना कंगनाने थेट मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली. “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असं म्हटलं. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असं कंगना म्हणाली. कंगनाच्या या ट्विटरवर प्रतिक्रिया देताना रेणुका यांनी, “प्रिय कंगना, मुंबई हे ते शहर आहे तिथे तुझं बॉलिवूड स्टार होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. या शहराचा तू थोडा तरी मान ठेवावा अशी अपेक्षा आहे. तू मुंबई आणि पीओकेची तुलना केली हे पटल नाही. हे म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला,” असं ट्विट केलं.




No comments