माऊली फाऊंडेशन कडून फलटण नगर परिषदेस रुग्णवाहिका

An ambulance has been provided to Phaltan Municipal Council by Mauli Foundation, Kalbadevi Mumbai.
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - माऊली फाऊंडेशन, काळबादेवी मुंबई यांच्याकडून फलटण नगर परिषदेला एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. आमदार दिपकराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, फलटण वकील संघाचे अध्यक्ष ॲड राहुल कर्णे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये माऊली फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष ॲड विश्वनाथ टाळकुटे यांनी रुग्णवाहिकेच्या चाव्या मुख्याधिकारी यांच्याकडे सुपूर्द केल्या.
माऊली फाऊंडेशन, काळबादेवी मुंबई ही एक सामाजिक संस्था असून, ती वैद्यकीय मोफत सेवा तसेच इतर सामाजिक सेवा देण्याचे कार्य मागील काही वर्षापासून करत आहे. सध्या covid-19 च्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे प्रशासनासमोर येणाऱ्या अडचणी व प्रशासनास करावी लागणारी तारेवरची कसरत विचारात घेता, त्यामध्ये रुग्णवाहिका ही रुग्णांना वेळेत दवाखान्यामध्ये पोहोच करण्याचे माध्यम असून, दवाखाना व पेशंट यांचे मधील मोठी दुवा आहे, त्यामुळे वेळेत रुग्णवाहिका सेवा रुग्णांना मिळणे तेवढेच महत्त्वाचे व गरजेचे झाले आहे. बऱ्याच रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याबाबत च्या बातम्या आपल्या कानावर येत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून, माऊली फाऊंडेशन संस्थेने एक रुग्णवाहिका covid-19 आणि गरजू पेशंटसाठी फलटण शहरामध्ये उपलब्ध करून दिली आहे.
दिनांक 3 सप्टेंबर 2020 रोजी माऊली फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष ॲड विश्वनाथ टाळकुटे यांनी रुग्णवाहिकेच्या चाव्या व पत्र फलटण नगर परिषदेकडे दिले, याप्रसंगी आमदार दिपकराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता,पत्रकार सुभाष भांबुरे, ॲड. रोहित अहिवळे प्रसन्न रुद्रभटे, बाळासाहेब ननावरे, फलटण वकील संघाचे अध्यक्ष ॲड राहुल कर्णे, ॲड. अविनाश अभंग, ॲड.धीरज टाळकुटे, अभिजित माळवदे यांच्यासह माऊली फाऊंडेशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल फलटण प्रशासनाच्या वतीने माऊली फाऊंडेशन चे आभार व्यक्त करण्यात आले.
No comments