Breaking News

फलटण तालुक्यामध्ये हुमणी आळी नियंत्रण एक दिवसीय ऑनलाईन शेतकरी प्रशिक्षण संपन्न

 

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - खरीप हंगाम सन 2020 च्या अनुषंगाने  मंडळ कृषि अधिकारी बरड,ता फलटण कृषि विभागा मार्फत हुमणी आळी नियंत्रण एक दिवसीय  शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे मौजे निंबळक ता फलटण जिल्हा सातारा येथे दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजी आयोजित ऑनलाईन शेतकरी प्रशिक्षण संपन्न झाले.

         प्रशिक्षण वर्गाकरिता मार्गदर्शक म्हणून डॉ पांडुरंग मोहिते निवृत्त प्राचार्य कृषि महाविद्यालय कोल्हापूर यांनी यावेळी हुमणी आळी नियंत्रण या विषयावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
 यावेळी कोरोना महामारी रोगामुळे व शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून  ओनलाईन शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन केले असल्याचे श्री भरत रणवरे मंडळ कृषि अधिकारी बरड यांनी सांगितले 
यावेळी निबंळक ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित शेतकऱयांनी योग्य सोशल डिस्टनस ठेवून ऑनलाईन शेतकरी प्रशिक्षण स्लाईड प्रजोक्टर वरती माहिती घेतली. 
यावेळी प्रशिक्षणासाठी फलटण तालुक्यातील व महाराष्ट्रतील शेतकरी व कृषि अधिकारी , कृषि पर्यवेक्षक कृषि सहाय्यक सहभागी झाले होते.

        प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम प्रमोद जाधव कृषि अधिकारी , भरत रणवरे मंडळ कृषि अधिकारी बरड, मल्हारी नाळे कृषि पर्यवेक्षक बरड,  सचिन नेवसे व सिंधु अभंग कृषि सहाय्यक,  सचिन जाधव कृषि सहाय्यक यांनी घेतले.

No comments