Breaking News

गॅस टँकर चालवताना चालक बेशुद्ध ; पोलीस संजय चौगुले यांनी अनर्थ टाळला

 

        माढा ( गंधवार्ता प्रतिनिधी) - सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे कार्यतत्पर पोलीस नाईक संजय चौगुले यांनी प्रसंगावधान साधत मोठ्या शिताफीने चालक बेशुद्ध पडलेल्या चालू गॅस टँकरवर चढून दरवाजा उघडला व ब्रेक मारत टँकर थांबविला.चौगुले यांनी दाखविलेल्या साहसामुळे मोठा अनर्थ टळला आहे, पोलीस नाईक संजय चौगुले यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगतानाच चौगुले यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचे कौतुक केले आहे.

        सोलापूर पुणे महामार्गावरील सावलळेश्वर टोलनाक्याजवळ गॅस टँकर वरील चालकाचे बेशुद्ध अवस्थेमुळे नियंत्रण सुटले होते. एवढ्यात महामार्ग पोलीस केंद्रातील पोलीस नाईक संजय चौगुले यांनी प्रसंगावधान राखून मोठ्या शिताफीने चालू गॅस टँकरवर चढुन दरवाजा उघडून ब्रेक मारुन टँकर थांबवला त्यामुळे पुढे होणारा अनर्थ टळला.
टँकरवर कंट्रोल मिळवल्यानंतर पोलीस संजय चौगुले 
         सोलापूर पुणे महार्गावरील पाकणी येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राजवळ पोलीस नाईक संजय चौगुले हे आपली ड्युटी बजावत होते. या दरम्यान पुण्याहून सोलापूरच्या दिशेने येणार ट्रक वेडावाकडा येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनतर त्यांनी ट्रकला हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ट्रकचालक सीटवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला. त्यानंतर पोलीस नाईक संजय चौगुले यांनी मोठ्या शिताफीने तो ट्रक थांबवून पुढे होणार अनर्थ टाळला. 

No comments