Breaking News

सपकाळवाडी येथे कृषिकन्यांकडून चारा व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

सपकाळवाडी (तरडफ) येथे चारा व्यवस्थापन प्रात्यक्षिक सादर करताना कृषीकन्या 

   सोमंथळी (गंधवार्ता प्रतिनिधी) - सपकाळवाडी (तरडफ) ता. फलटण येथे राजर्शी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 'रावे' यंदा स्वतःच्या गावातूनच राबविण्यात येत आहे.  या कार्यक्रमाच्या निमिताने विद्यार्थीनी अनुजा गोडसे, गौरी घनवट, शिवानी मोरे यांच्या कडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून,  गावातील शेतकरी वर्ग प्रशिक्षित करणे सुरू आहे.

        विद्यार्थीनींनी शेतकऱ्यांना चारा प्रक्रिया कशी करायची याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. चारा प्रक्रियेचे फायदे ,  प्रक्रिया करण्याची पध्दत तसेच तो चारा किती दिवसांनी वापरावा याची माहिती विद्यार्थीनींनी शेतकऱ्यांना दिली.

        एकूण दहा आठवडे चालणारा हा कार्यक्रम विविध २०  प्रकारची कृषी प्रात्यक्षिक  शेतकऱ्यांना दाखविले जाणार आहेत.  विद्यार्थ्यांना कृषी प्रात्यक्षिकासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी.एन.रसाळ, कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. बी.टी. कोलगणे यांचे मार्गदर्शन मिळाले.

No comments