गिरवी येथे कृषी कन्येने पटवून दिले चारा प्रक्रियेचे महत्त्व

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - गिरवी (ता. फलटण) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज आयोजित ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कुमारी प्राजक्ता रमेश फरांदे हिने शेतकऱ्यांना चारा प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले. या
या विद्यार्थिनीने वाळलेल्या चाऱ्यावर प्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना करून दाखवले. त्यासाठी लागणारी सामग्री व प्रक्रिया सांगितली. मीठ, युरिया व गुळ पाण्यात मिसळून त्याचे मिश्रण करावे आणि ते मकेच्या किंवा ज्वारीच्या वाळलेल्या चाऱ्यावर शिंपडावे आणि नंतर तो प्रक्रिया केलेला चारा सात ते आठ तास हवाबंद झाकून ठेवावा. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा हिरव्या चाऱ्याची कमतरता भासते, तेव्हा हा प्रक्रिया केलेला चारा एक उत्तम खाद्य म्हणून वापरता येतो. तसेच जनावरांच्या दूध उत्पादनातही वाढ होते तसेच याचा शेतकऱ्यांना आर्थिक फायदा कसा होतो याची माहिती शेतकऱ्यांना दिली. या कार्यक्रमासाठी गिरवी गावाचे प्रगतशील शेतकरी श्री.चंद्रकांत सुतार, यांचे सहकार्य लाभले.
हे प्रात्यक्षिक करण्यासाठी विषय शिक्षक प्रा.डी.सी.मेटकरी,यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय जय सिंह मोहिते-पाटील महाविद्यालयाचाये समन्वयक - डॉ . डी.पी. कोरटकर,प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम अधिकारी एस.एम. एकतपुरे ,प्रा.एस .आर. आडत, प्रा.डॉ. डी.एस.ठवरे यांचे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम गिरवी येथे घेण्यात आला.
No comments