फलटण तालुक्यात 52 कोरोना पॉझिटिव्ह, 1 मृत्यू मंगळवार पेठेत 10 रुग्ण

फलटण दि. 10 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 10 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार फलटण तालुक्यात आज 52 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 29 व्यक्ती तर ग्रामीण भागात 23 रुग्ण सापडले आहेत. तर 1 व्यक्ती मृत पावली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
फलटण शहरात 29 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये
मंगळवार पेठ 10 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
शिवाजीनगर फलटण 4 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
कसबा पेठ 3 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
तसेच बुधवार पेठ 2, पृथ्वी चौक फलटण 1, लक्ष्मीनगर फलटण 1,संजीवराजे नगर 1, फलटण असा पत्ता दिलेले 7 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात 23 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये
जिंती 5 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
कोळकी 3 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
तसेच सांगवी 1, तरडगाव 2, सरडे 1, सोमंथळी 2, घाडगेवाडी 1, अलगुडेवाडी 1, ,कापशी 1, साखरवाडी 2, विडणी 1, राजाळे 1, सुरवडी 1, सस्तेवाडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
1 रुग्णाचा मृत्यू
रविवार पेठ फलटण येथील 85 वर्षीय पुरुष या कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
No comments