Breaking News

गोखळीपाटी येथे भारत गॅसचा ट्रक पुराच्या पाण्यात

 

Bharat Gas truck in flood waters at Gokhalipati
        गोखळी  दि. 10 सप्टेंबर ( गंधवार्ता प्रतिनिधी ) फलटणहून आसू कडे ग्राहकांना गॅस सिलेंडर पोहचवण्यासाठी निघालेला भारत गॅसचा ट्रक गोखळी पाटी येथे ओढ्यास आलेल्या पुराच्या पाण्यात रस्त्यावरून वाहून ओढ्यात पडला. ट्रक मधील गॅस सिलेंडर हे साखळीने एकमेकाला बांधले असल्यामुळे जास्त नुकसान झाले नाही. ट्रक चालकाला गोखळी येथील युवकांनी बाहेर काढले आहे. 
 
        भारत गॅस कंपनीचा MH-11  AL 0632 ट्रक फलटणमधून आसू कडे ग्राहकांना गॅस सिलेंडर पोहचवण्यासाठी निघालेला होता.  गोखळी पाटी येथे ओढ्यास पूर येऊन पाणी पुलाच्या वरून चालले होते. ट्रक पुलाच्या मध्यभागी आल्यावर पुराच्या पाण्याच्या ओढीने ट्रक ओढ्यात वाहत गेला व तेथे आडवा पडला. 
         ट्रक चालक श्री.  संकपाळ यांनी प्रसंगावधान राखल्याने नुकसान टळले, सदर घटना आज दि.10 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास गोखळी पाटी येथे घडली. या ट्रकमध्ये 350 भारत गॅस कंपनीचे  सिलेंडर होते. ट्रक मध्ये सर्व सिलेंडर साखळी मध्ये लाॅक केलेले असल्यामुळे गॅस सिलेंडर इतरत्र फेकले गेले नाहीत.  ट्रक चालक संकपाळ यांना युवकांनी सुखरूप बाहेर काढले. ओढ्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी घटना पाहण्यासाठी गर्दी केली होती. ओढ्याच्या दोन्ही बाजूच्या शेतातील पिकांचे नुकसान तसेच गोखळीपाटी येथील दुकानात पाणी घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
        बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यास मोठ्या प्रमाणात पुरपरस्थिती निर्माण झाली, यामुळे फलटण -आसू मार्गावरील वाहतूक गुरुवार दुपारी दोन वाजले पर्यंत बंद होती, फलटण पूर्व भागातील असंख्य कामगार दररोज बारामती येथील औद्योगिक वसाहती मध्ये कामासाठी जातात, पण पुराच्या पाण्यामुळे कामावर जावू शकले नाहीत. फलटण-आसू मार्गावरील ओढ्यांना पाणी असल्याने येणारे नोकरदार कर्मचारी येवू शकले नाहीत.  ग्रामपंचायत बॅक,सोसायटी आदी सेवक कामावर वेळेवर पोहोचू शकले नाहीत.

No comments