शिवसेना के कंपाउंडर को हेडलाइन बनाने की भारी भूख - संजय निरुपम

गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 27 सप्टेंबर 2020) - असं वाटतंय शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची मोठी भूक लागली आहे. ही भूक नेहमी नेत्याची राजकीय कारकीर्दी उद्ध्वस्त करते. ही दुर्भावना नाही तर, वास्तविकता आहे,असं ट्विट काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलं आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबईमधील हयात हॉटेल येथे भेट झाली होती. या भेटीचे सोशल मीडियावर वेग वेगळे पडसाद उमटले तसेच संजय राऊत - देवेन्द्र फडणवीस भेटीनंतर राज्यातील राजकीय चर्चेला उधान आले आहे. आपआपल्या परीने जोतो या भेटीचा तर्क लावत आहेत.
संजय राऊत आणि भाजपाकडून या भेटीमागील कारण स्पष्ट केलं असले तरीही या भेटीची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. त्यामध्ये काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर नाव न घेता ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.
काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ऐसा लगता है शिवसेना के कंपाउंडर को हेडलाइन बनाने की भारी भूख लग गई है।
यही भूख अक्सर नेताओं को खा जाती है।
यह दुर्भावना नहीं, एक वास्तविकता है।

No comments