गॅलेक्सी क्रेडीट सोसायटी तर्फे वाहन कर्ज सुरू
![]() |
श्री चांगभले यांना वाहनाची चावी सुपूर्द करताना संस्थेचे चेअरमन सचिन यादव व इतर |
फलटण - गॅलेक्सी को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. फलटण तर्फे नुकतेच कार लोन व नवीन चारचाकी वाहन खरेदी कर्ज सुरू करण्यात आले असून, त्यासाठी पतसंस्थे तर्फे अनेक सूटसुटीत पर्याय देण्यात आले आहेत,
गॅलेक्सी को.ऑप. क्रेडीट सोसायटी तर्फे अत्यंत कमी वेळेत तत्परतेने चार चाकी खरेदी कर्ज देण्यात येत असल्या मूळे ग्राहक या योजने कडे आकृष्ट होत असलेचे चित्र निर्माण झाले आहे.
संस्थे तर्फे नुकतेच श्री श्रावण चांगभले यांना चारचाकी खरेदी कर्ज देण्यात आले, त्यावेळी त्यांनी पतसंस्थे मार्फत देण्यात आलेल्या तत्पर सेवे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली व शोरूम मधील व तत्सम कार्यवाहिस संस्थे तर्फे करण्यात आलेल्या मदती बद्दल देखील आभार व्यक्त केले.
संस्थेचे ग्राहक श्री श्रावण चांगभले यांच्या विनंती नुसार त्यांच्या वाहनाचे पूजन काल संस्थेचे चेअरमन व के बी एक्सपोर्टस तसेच के बी बायो ऑर्गनिक्स चे संचालक सचिन यादव यांच्या हस्ते करण्यात आले व त्यावेळी चावी प्रदान करण्यात आली.
गॅलेक्सी को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. फलटण तर्फे अनेक प्रकारचे कर्ज देण्यात येत असून, सोने तारण कर्जात कमित कमी व्याजदर ठेवून, एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, संस्थे तर्फे वार्षिक फक्त ७४६२ रु व्याजदरात सोने तारणाची सोय करण्यात आली आहे. या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे चेअरमन सचिन यादव यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
No comments