Breaking News

सांस्कृतिक भवनाचा निधी कोविड हॉस्पिटलसाठी वापरावा - नगरसेवक अशोक जाधव

 

Ashok Jadhav demands that funds of Sanskritik Bhavan should be used for covid Hospital
        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -   प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून 2  कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी कोविड 19 हॉस्पिटल साठी वापरण्यात यावा अशी मागणी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.

        फलटण नगर परिषदेचे प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाने वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून 2 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. वास्तविक आज नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सांस्कृतिक भवन ऐवजी कोविड हॉस्पिटल सुरू करण्याची गरज आहे. तरी सांस्कृतिक भवन दुरुस्तीसाठी आलेला निधी कोविड हॉस्पिटलसाठी वापरावा व फलटण मधील नागरिकांसाठी एक सुसज्ज हॉस्पिटल उभे राहावे अशी मागणी नगरपरिषद विरोधी गटाचे गटनेते अशोक जाधव यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

        दि. 11 सप्टेंबर 2020 रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सांस्कृतिक भवन दुरुस्ती चा विषय घेतला आहे, तरी तो निधी कोविड हॉस्पिटल साठी वर्ग करण्यात यावा व तसा ठराव करावा, अशी लेखी मागणी नगरसेवक अशोक जाधव यांनी केली आहे.

No comments