Breaking News

422 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 1134 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

        सातारा दि. 8 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या  आज संध्याकाळपर्यंत 422  नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 1134 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 1134 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

        स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 10,उपजिल्हा रुग्णालय कराड 44, उपजिल्हा रुग्णालय फलटण 92, कोरेगाव 82, वाई 155, खंडाळा 109, रायगांव 90,  पानमळेवाडी 58, मायणी 84, महाबळेश्वर 50, पाटण 19, दहिवडी 46, खावली 49, तळमावले 20 व कृष्णा मेडीकल कॉलेज  कराड 226 असे एकूण 1134 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी  माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने --51711

एकूण बाधित --  19609

घरी सोडण्यात आलेले --- 11451 

मृत्यू --  536

उपचारार्थ रुग्ण --7622  

No comments