श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
Shrimant Sanjeevraje Naik-Nimbalkar's corona test positive
फलटण दि 17 ऑगस्ट ( गंधवार्ता वृत्तसेवा) - सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे. ते सध्या होम आयसोलेशन मध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मागील १५ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःला होम क्वारंटाइन करावे व त्यानंतर कोरोना चाचणी करून घ्यावी. नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे. बाहेर पडल्यानंतर मास्क वापरून, सोशल डिस्टंसिंग चे पूर्णतः पालन करावे.
श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केलेल्या आवाहनामध्ये पुढे असे म्हटले आहे की, मला कोरोना लक्षणे असल्याने मी स्वतः कोविड १९ टेस्ट केली असता ती पॉझीटीव्ह आली असल्याने, मी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे, माझी प्रकृती उत्तम आहे.
शहर व तालुक्यातील गेल्या १५ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला ७ दिवस होम क्वारंटाइन करावे व ८ व्या दिवशी कोविड १९ टेस्ट करुन घ्यावी, आपण होम क्वारंटाइन झाल्याचे फलटण शहरातील नागरिकांनी नगर पालिकेस आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी पंचायत समितीचे कार्यालयात कळवावे असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी केले आहे.
No comments