Breaking News

283 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज तर 672 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 

       सातारा दि.17 :  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 283    नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले  तर 672 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.  

  विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  जावली तालुक्यातील 28, कराड तालुक्यातील 73, खंडाळा तालुक्यातील 28, खटाव तालुक्यातील 14, कोरेगांव तालुक्यातील 20, महाबळेश्वर तालुक्यातील 5, माण तालुक्यातील 1, पाटण तालुक्यातील  9, फलटण तालुक्यातील 18, सातारा तालुक्यातील 52, वाई तालुक्यातील 35  असे एकूण 283 नागरिकांचा समावेश आहे.

  672 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 112, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 21, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 18, कोरेगाव 50, वाई येथील 55, खंडाळा येथील 62, रायगाव 30,  मायणी येथील 45, महाबळेश्वर येथील 100, पाटण येथील 7, दहिवडी येथील 35 असे एकूण 672 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुनिल सोनवणे यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने -- 36687

एकूण बाधित -- 7593

घरी सोडण्यात आलेले --- 4223

मृत्यू -- 249

उपचारार्थ रुग्ण -- 3121

 

No comments