आत्महत्ये अगोदर युवकाची क्लिप : माझे करिअर खराब केले, यांना कठोर शिक्षा करा!
फलटण दि. 16 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - चुलत भावांमध्ये महीन्या भरा पूर्वी झालेल्या भांडणात पोलिस स्टेशनला दाखल केलेला गुन्हा माघारी घेण्यासाठी चुलत्याने पुतण्यावर शारीरिक व मानसिक त्रास देऊन दबाव टाकल्यामुळे, संकेत संजय शिर्के वय २२ या युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी दोन सख्या भावांवर फलटण ग्रामिण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्यातील आरोपींना अटक करणेत आली आहे.
काय आहे क्लिपमध्ये!
संकेतने आत्महत्ये पूर्वी त्याच्या मोबाईलवर व्हीडीओ क्लीप काढली होती, त्यामध्ये राजू आणि सुरेश यांनी माझ्या वर खोटा गुन्हा दाखल करुन, माझे करिअर खराब केले, यामुळे मला नोकरी लागू शकत नाही. यांच्या त्रासा मुळेच मी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख असून या दोघांना कठोर शिक्षा करा, असे बोलत संकेतने गळफास घेतला.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, विडणी ता. फलटण (शिर्केमळा) येथे राहणाऱ्या संकेत संजय शिर्के वय-२२ या युवकाने गुरुवार दि.१३ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास व्यायामासाठी जातो असे सांगून, घरातून बाहेर पडला व आपल्या घराशेजारी असणाऱ्या गुरांच्या गोठ्यात त्याने नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
संकेतने आत्महत्या करण्या अगोदर स्वतःच्या मोबाईल वर व्हीडीओ क्लीप काढुन यामध्ये दोन व्यक्तींची नावाचा उल्लेख केला असल्याचे आढळून आले आहे.
या बाबत संकेतचे वडील संजय गजानन शिर्के वय ५० यांनी मोबाईल मधील व्हीडीओ क्लीप, पोलिस अधिकारी यांना दाखवून, आमच्या भावकीतील राजेंद्र संपत शिर्के, सुरेश संपत शिर्के,धनंजय संपत शिर्के यांच्याशी महिन्या पूर्वी भांडण झाले होते या भांडणात संकेतच्या आईचा विनयभंग संबधित आरोपीने केल्या बाबत गुन्हा दाखल केला होता. याचवेळी दोघांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात एकमेकांच्या विरुध्द फिर्याद दाखल करणेत आली असल्याची माहिती संजय शिर्के यांनी पोलिसांना दिली.
या केस मध्ये जाणिवपुर्वक माझ्या मुलाचे करिअर खराब करण्याच्या उद्देशाने, खोटा गुन्हा दाखल करुन, त्यास अटक करणेत आली होती.तसेच आरोपी हे महीनाभर वेळोवेळी माझ्या मुलास भेटून दमदाटी करुन केस काढुन घेण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देऊन दबाव आणत असल्याचे शिर्के यांनी पोलिसांना सांगून, यामुळे माझ्या मुलाचे मानसिक खच्चीकरण झाल्याने त्यास आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यामुळे राजेंद्र संपत शिर्के व सुरेश संपत शिर्के या दोघांवर संकेतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल संकेतचे वडील संजय गजानन शिर्के वय ५० यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाणेत गुन्हा दाखल करणेत आला आहे.
या प्रकरणी राजेंद्र संपत शिर्के व सुरेश संपत शिर्के यांना अटक करुन चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास फलटण ग्रामीणचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत करीत आहेत.
शिर्के कुटूंबावर दुखाचा डोंगर
संकेत हा अत्यंत हुशार अभ्यासू इंजिनियरचा पदवीधर होता, शांत व मनमिळावू स्वभावाचा होता. त्याच्या जाण्याने मित्र मंडळी, नातेवाईक यांना धक्का बसाला असून, शिर्के कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तरी संकेतला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी संबधित आरोपीस कठोर शिक्षा करणेत यावी असे संकेतच्या कुंटुबियांनी मागणी केली आहे.
No comments