Breaking News

सातारा जिल्ह्यातील 214 कोरोना बाधित; 16 बाधित नागरिकांचा मृत्यू

 

214 corona affected in Satara district; Death of 16 affected civilians

        सातारा दि. 16 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) -: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 214 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 16 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची  माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोनाबाधित अहवालामध्ये फलटण तालुक्यातील  फलटण 1, मलठण 1, मांडव खडक 1,

वाई तालुक्यातील वाई शहरातील रविवार पेठ 11,  वाशिवली 1,  सह्याद्रीनगर 4,  यशवंतनगर 3, नवेचीवाडी 3,  ब्राम्हणशाही 2, फुलेनगर 6, सिध्दनाथवाडी 2 , दत्तनगर 1,  सोनगिरवाडी 3, बावधन 1, रामडोहाळी 2, चिखली 1,

सातारा तालुक्यातील   सातारा शहरातील मंगळवार पेठ 7,  सातारा पोलीस स्टेशन 2, राजमाता सुमित्राराजे कॉलनी शाहूनगर 2,  शुक्रवार पेठ 1, देवी चौक 1,  प्रतापगंज पेठ 1, बुधवार नाका 2, सर्कल हाऊस 2,  बुधवार पेठ 1, सुर्यवंशी कॉलनी दौलतनगर (सातारा) 2,  गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठेतील जिजामाता कॉलनी 2, शाहूपूरी 1, गोडोली 1, लिंबाचीवाडी (नंदगाव) 1,  चिंचणेर निंब 2,  पिरवाडी 1, डबेवाडी 1, अतित 1, शहापूर 1, कोडोली 1,  काशिळ 1, सातारा 1, सातारा शहर 2,

कराड तालुक्यातील कराड शहरातील मंगळवार पेठ 4,  सोमवार पेठ 6, कापील 2, शनिवार पेठ 8, रविवार पेठ 3, बुधवार पेठ 1,  कार्वे नाका 3,  सह्याद्री हॉस्पीटल 1, मलकापूर 1, गजानन हौसिंग सोसायटी सैदापूर 1, पाल 1, मसूर 2, नांदगाव 1,  वारुंजी विमानतळ 1, कुसुर 1, विद्यानगर 1, ओंड 4,  सैदापूर 1, चचेगाव 1, किणी 1,  कोपर्डे हवेली 1, जखीणवाडी 1, शिरवडे 1, कराड 5,

पाटण तालुक्यातील  माजगाव 2, पाटण  8, मल्हारपेठ 2, मारुल हवेली 6, ढेबेवाडी 3, सणबुर 1, गारवडे 2,

महाबळेश्वर तालुक्यातील   गवळी मोहाळा महाबळेश्वर 2, 

कोरेगाव  तालुक्यातील  कुमठे 11, कोरेगाव पोलीसस्टेशन 2, चवणेश्वर (करंजखोप) 3, खाटीक गल्ली रहिमतपूर 10, चिंचेचा मळा रहिमतपूर 1, वाठार किरोली 1,

खटाव तालुक्यातील  मोरोळे 2,  वडूज 2, पुसेगाव 1, मायणी 2, डांभेवाडी 3, राजाचे कुर्ले 4,

माण तालुक्यातील  भालवडी 3, म्हसवड 1,

जावळी तालुक्यातील   मोरघर 1.,

खंडाळा तालुक्यातील  मारुती मंदीराजवळ- वाण्याचीवाडी 1,

इतर जिल्हा- कलमवाडी (वाळवा-सांगली) 2,  अंबक (कडेगाव-सांगली), डोंबिवली 1(ठाणे जिल्हा),

16 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू

क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे कोरोनाबाधित असलेल्या कणुर ता.वाई येथील 80 वर्षीय पुरुष, वाठारा किरोली ता. कोरेगाव येथील 85 वर्षीय महिला, गोडोली ता. सातारा येथील 80 वर्षीय महिला, खोदाद ता. सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, केसे ता. कराड येथील 64 वर्षीय पुरुष, विंग खंडाळा येथील 73 वर्षीय पुरुष, कराड शहरातील शनिवार पेठेतील 65 वर्षीय महिला तर विविध खाजगी रुग्णालयात कराडातील मंगळवार पेठेतील 68 वर्षीय पुरुष,  सणबुर ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, बावधन ता. वाई येथील 51 वर्षीय पुरुष, नवेचीवाडी ता. वाई येथील 55 वर्षीय पुरुष, साता-यातील मंगळवार पेठेतील 61 वर्षीय पुरुष,  गुरुवार पेठेतील 73 वर्षीय महिला, गडकर आळीतील 57 वर्षीय पुरुष, फुलेनगर ता. वाई येथील 55 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी ता. पाटण येथील83 वर्षीय पुरुष अशा एकूण 16 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.

No comments