Breaking News

भाजपच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी जयकुमार शिंदे यांची निवड

        फलटण  दि.  16 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) -  भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर याचे विश्वासू व निष्ठावंत सहकारी, मित्र म्हणून सातारा जिल्ह्यात व माढा मतदार संघात परिचित असलेले जयकुमार शिंदे यांची निवड करण्यातआली आहे.

         महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन चे संचालक जयकुमार शिंदे हे सहकार क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात उत्तम ,व उल्लेखनीय काम करणारे व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे सहकारी म्हणून काम करत आहेत. यामुळेच सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी जयकुमार शिंदे यांची निवड केली आहे .या पक्षसंघटनेत केंद्र सरकारच्या वतीने शेतकरी तसेच सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर, सामान्य लोकांना केंद्रबिंदू म्हणून कामे केली आहेत याचा फायदा भाजपला होणार असून इथून पुढे होणाऱ्या सर्व  निवडणुकीत भाजपला खूप मोठा फायदा होणार आहे. जयकुमार शिंदे यांच्यावर फलटण  व माण तालुका या दोन तालुक्याची पक्ष संघटनेच्या काम करण्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपवली आहे व त्यांच्याकडून पक्ष संघटनेचे चांगले काम होईल अशी अपेक्षा केली गेली आहे. 

        फलटण  व माण तालुक्यातील पक्ष संघटनेच्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची वाटचाली गतिमान करण्यात येईल असे यावेळी जयकुमार शिंदे यांनी सांगितले.


No comments