Breaking News

गोळीबार मैदान, फलटण व खामगाव येथे कोरोना बाधित


        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि.15 जुलै रोजी रात्री उशिरा आलेल्या covid-19 कोविड च्या चाचणी रिपोर्ट नुसार, फलटण शहरात एक तर फलटण तालुक्यात एक असे एकूण 2 रुग्ण बाधित सापडले आहेत.  खामगाव तालुका फलटण येथे एक कोरोना बाधित रुग्ण सापडला असून, फलटण शहरात गोळीबार मैदान या भागात एक कोरोना रुग्ण सापडला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

         मौजे साखरवाडी येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील मौजे खामगाव (सात सर्कल) येथील २१ वर्षांच्या पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 
        तर फलटण शहरातील गोळीबार मैदान  येथील ५३ वर्षीय सारी पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

No comments