Breaking News

सातारा जिल्हा परिषदेकडून कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाचे निराकरण करण्यासाठी कंत्राटी पदभरती


        सातारा दि.15 -: सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे निराकरण करण्यासाठी व सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने विविध पदांची भरती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
            कंत्राटी पद भरती मध्ये फिजिशियन, भुलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, क्ष किरण तंत्रज्ञ, इ सी जी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, डाटाट ऑपरेटर यांचा समावेश आहे.  आरोग्य सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा व जिल्हा रुग्णालय तसेच कोरोना केअर सेंटर येथे असेल.  कोरोना साथीचा संसर्गजन्य आजार नियंत्रणात येईपर्यंत शासकीय, महानगरपालिका, नगरपालिका सेवा क्षेत्रामधून निवृत्त झालेले, बाँड पूर्ण झालेले व इतर आरोग्य सेवा देण्यास सक्षम असणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका व इतर पदांची  कंत्राटी पद्धतीने पदे भरावयाची आहेत. त्यासाठी
            पदभरती जाहिरात अटी शर्तीसह zpsatara.gov.in या संकेतस्थळावर पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करावयाची पद्धत- ऑनलाईन असेल. ऑनलाईन सादर करावयाची शेवटची मुदत 18 जुलै 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल.  ऑनलाइन अर्ज करण्यासाठी http://bit.ly.NHMSTR या लिंक तसेच क्यूआर कोडचा  वापर करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

No comments