गोविंद काकडे बेपत्ता प्रकरणाचा तपास त्वरित होण्याची मागणी
फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा) - २७ वर्षीय इंजिनिअर गोविंद प्रकाश काकडे गेली आठ दिवसापासून, आसगाव, सातारा येथून दि. 8 जुलै 2020 पासून बेपत्ता झाला आहे. पोलिसांसह नातेवाईक त्याचा शोध घेत आहेत, दरम्यान त्याने जी दुचाकी वाहन नेले होते ते, अहमदनगर जिल्ह्यात सुपा येथे संशयास्पद अवस्थेत आढळून आले असल्याने घातपात झाल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याअनुषंगाने आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक सौ तेजस्वी सातपुते, उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांना संविधान समर्थन मोर्चा समिती फलटण यांच्या वतीने निवेदन देऊन या घटनेचा त्वरित तपास व्हावा अशी मागणी केली आहे.
इंजिनिअर श्री. गोविंद प्रकाश काकडे( वय-२७, कामाचे ठिकाण-भारत फॉर्ज (कल्याणी ) वडूथ, सातारा) हा कामानिमित्त आसगाव , सातारा ( मूळ गाव - फलटण ) येथून दि. 8 जुलै 2020 रोजी साधारण संध्याकाळी 7 वा. वडुथ ला जाऊन येतो, असे सांगून MH-11 CT 1717 , Black Unicorn ही गाडी घेऊन गेला ते आजपावेतो आलेला नाही. त्याची बेपत्ता असलेली नोंद 9 जुलै 2020 रोजी, सातारा ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेली आहे. त्यानंतर तपासा दरम्यान 11 जुलै 2020 रोजी त्याने घेऊन गेलेली दुचाकी ही सुपा, ता. जि. अहमदनगर येते एका निर्जन स्थळी संशयास्पद आढळून आलेली आहे. प्रथम दर्शनी , त्याचा काहीतरी घातपात केला असावा किंवा तो कोणत्या तरी मोठ्या संकटात असून त्याच्या जीविताला धोका असावा असे दिसून येत आहे.
परिणामी सदर प्रकरण हे खूपच गंभीर असून , त्याचा तपास धिम्या गतीने न करता, तातडीने व त्वरित करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याला बेपत्ता होऊन, आठ दिवस झाले तरी संबंधित पोलिस यंत्रणेचा तपास हा खूपच धिम्या गतीने होतो आहे. परिणामी त्याच्या नातेवाईक, मित्रमंडळी, समाज्यातील व्यक्ति मध्ये तीव्र नाराजी व प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे , सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन , इंजिनिअर गोविंद प्रकाश काकडे यांचा शोध त्वरित लावावा अशी मागणी संविधान समर्थन मोर्चा समिती, फलटण यांच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे.
No comments