सातारा जिल्ह्यात 29 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 473 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा दि. 16 - : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 29 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची तालुकानिहाय माहिती :
जावली तालुक्यातील मुनावळे येथील 65 वर्षीय पुरुष,
सातारा तालुक्यातील कण्हेर येथील 32 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 46 वर्षीय महिला, माहुली येथील 55 वर्षीय पुरुष, कोडोली 48 वर्षीय पुरुष, सातारा येथील 24 आणि 28 वर्षीय पुरुष, गोजेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, जिहे येथील 4 वर्षीय बालिका,
कोरेगाव तालुक्यातील चौधरीवाडी येथील 30 वर्षीय महिला,
कराड तालुक्यातील तुळसण येथील 60 वर्षीय पुरुष, लटकेवाडी येथील 42 वर्षीय महिला, मलकापुर येथील 34, 50 वर्षीय पुरुष, 30 आणि 45 वर्षीय महिला, कराड येथील 40 वर्षीय पुरुष, शामगांव येथील 49 वर्षीय पुरुष.
वाई तालुक्यातील पसरणी येथील 44, 30 आणि 52 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष, केंजळ येथील 70, 48 वर्षीय महिला, 48, 23 वर्षीय पुरुष.
खंडाळा तालुक्यातील मऱ्याचीवाडी येथील 34 वर्षीय पुरुष, लोणंद येथील 31 वर्षीय पुरुष.
खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील 33 वर्षीय पुरुष.
473 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथील 32, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 45, स्व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 46, फलटण येथील 36, कोरेगांव येथील 16, वाई येथील 74, शिरवळ येथील 49, रायगाव येथील 100, मायणी येथील 11, महाबळेश्वर येथील 20, पाटण येथील 31, खावली येथील 13 असे एकूण 473 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
घेतलेले एकुण नमुने 19933
एकूण बाधित 2073
घरी सोडण्यात आलेले 1179
मृत्यु 72
उपचारार्थ रुग्ण 822
No comments