Breaking News

मोनिका खलाटे(पाटील) हिला दहावीला Cbsc बोर्डात ९६% मार्क्स


        फलटण (प्रतिनिधी) - खुंटे ता.फलटण येथील मोनिका नवनाथ खलाटे(पाटील) हिने दहावी(Cbsc)बोर्ड परीक्षेत 96%मार्कस मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
         मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक व प्रसिद्धी प्रमुख पत्रकार यशवंत खलाटे(पाटील)यांची पुतणी मोनिका हिने हे दहावीच्या Cbse परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कुल जाधववाडी फलटण येथे शिक्षण घेतले असून तिचे वडील नवनाथ खलाटे हे येथील गोविंद डेअरीमध्ये नोकरी करित असून आई सौ.लतिका खलाटे एक उच्च शिक्षित असून त्या खाजगी ठिकाणी नोकरी करीत आहेत मोनिका ला मार्गदर्शन तिच्या आई वडील व प्रिन्सिपल मिनल दिक्षित, अंजुम शेख,जिलानी आतार यांनी केले असून तिच्या या यशाबद्दल राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
         तिच्या या यशाबद्दल जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे,सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुण्यनगरी चे जाहिरात विभाग प्रमुख संतोष कदम, ज्ञानेश्वर भोईटे, प्रसन्ना रुद्रभटे, अ‍ॅड. रोहित अहिवळे तसेच  मराठा क्रांती मोर्चा चे मार्गदर्शक ज्ञानेश्वर उर्फ माऊली सावंत, अभिजित सुर्यवंशी(बेडके) अमोलशेठ सस्ते,पै.शंभू बोबडे,फिरोजभाई बागवान,पत्रकार युवराज पवार,विक्रम चोरमले,शक्ती भोसले यांनी अभिनंदन केले आहे.

No comments