बिग बी कोविड पॉझिटिव्ह ; अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण
मुंबई: महानायक अमिताभ बच्चन यांना कोविड 19 ची लागण झाली असून आज सायंकाळी मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. याबाबत खुद्द अमिताभ बच्चन यांनीच ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
अमिताभ बच्चन यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण रुग्णालयात दाखल झालो आहे, असे अमिताभ यांनी नमूद केले आहे.
अमिताभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्वत: आपल्या आजारपणाबाबत माहिती देत संभ्रम वाढू दिलेला नाही. अमिताभ यांना आज सायंकाळी रुग्णायलात दाखल करण्यात आलं. त्यानंतर रात्री १० वाजून ५२ मिनिटांना त्यांनी ट्विट केलं व तपशील दिला. 'माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने संबंधित यंत्रणांना याबाबत कळवलं आहे. घरातील अन्य सदस्य आणि स्टाफचे स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यांचा करोना चाचणी अहवाल अजून आलेला नाही. त्याची प्रतीक्षा आहे', असे नमूद करतानाच अमिताभ यांनी संपर्कातील अन्य व्यक्तींनाही आवाहन केलं आहे. गेल्या दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया करोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती अमिताभ यांनी केली आहे.

No comments