श्री जानाई हायस्कुल राजाळे च 10 वी चा निकाल 95.45 टक्के
फलटण दि. ३० जुलै (गंधवार्ता वृत्तसेवा) -
श्रीराम एज्यूकेशन सोसायटी,फलटणचे श्री . जानाई हायस्कूल राजाळे या शाळेचा एस.एस.सी मार्च २०२० परीक्षेचा निकाल ९५ .४५% लागला आहे. सन २०२० साली s.s.c परिक्षेला एकूण विद्यार्थी १३२ विद्यार्थी बसले होते त्या पैकी 126 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयात जाधव शंतनू कृष्णात या विद्यार्थ्यांनी 465 गुण (९३%) मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु.भोसले स्नेहल गोरख हिने 462 गुण (९२%) द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर कु. जाधव सिद्धी गोरखनाथ हिने 456 गुण (९१.२०%) मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल श्रीराम एज्यूकेशन सोसायटी फलटणचे अध्यक्ष साहेब सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके),मानद सचिव सचिनभैय्या सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), सदस्य महेंद्रभैय्या सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) नियामक मंडळातील सर्व सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य श्री .बेंद्रे सर, पर्यवेक्षक श्री . अनपट सर ,सर्व मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
No comments