Breaking News

कृषि सहाय्यक सचिन जाधव यांचा जिल्हा कृषि अधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव


            फलटण  दि.  ३० जुलै  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  कृषि संजीवनी सप्ताह १जुलै ते ७ जुलै २०२० कार्यक्रम राजाळे, सरडे, साठे, ता फलटण जिल्हा सातारा या भागात अतिउत्कृष्ट राबविल्या बद्दल श्री सचिन जाधव कृषि सहाय्यक राजाळे यांचा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सातारा विजय कुमार राऊत, यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. 
            यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी फलटण प्रकाश सूर्यवंशी, तालुका कृषि अधिकारी फलटण  सुहास रणसिंग ,तंत्र अधिकारी फिरोज शेख , कृषि अधिकारी एम बी करे ,मंडळ कृषि अधिकारी भरत रणवरे, मंडळ कृषि अधिकारी अमोल सपकाळ, मंडळ कृषि अधिकारी पूजा दुदुसकर ,कृषि पर्यवेक्षक मल्हारी नाळे, कृषि पर्यवेक्षक राजेंद्र पालवे , कृषि पर्यवेक्षक बापू रुपणवर , कृषि पर्यवेक्षक दत्तात्रय एकळ आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments