महात्मा फुले हायस्कूल, सासवड 10 वी चा निकाल 96.72 टक्के

फलटण दि. ३० जुलै (गंधवार्ता वृत्तसेवा) - श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सासवड तालुका फलटण जि सातारा या विद्यालयाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे विभाग कोल्हापूर अंतर्गत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून तो 96.72% लागला आहे.
या विद्यालयात एकूण 61 विद्यार्थी परीक्षेस बसले होते पैकी 59 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातील अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक विवेक शालिवाहन गायकवाड 89.00%,द्वितीय क्रमांक कु. भुजबळ अंकिता अशोक 88.00%,तृतीय क्रमांक कारंडे सौरव हणमंत 87.80%, गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पैकी विशेष प्राविण्य यामध्ये 24 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये, 22 विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये, 10 विद्यार्थी व उत्तीर्ण श्रेणीमध्ये 3 विद्यार्थी आहेत.शिक्षक व विषय निहाय 100% निकाल यामध्ये श्री जाधव जी.व्ही( मराठी) ,श्री शिंदे पी पी( विज्ञान) श्रीबेडके एन व्ही (समाजशास्त्र) सौ काकडे एस.जी( गणित) श्री खताळ एन.डी( इंग्रजी) श्री लोखंडे एस.ए( हिंदी) सौ पुरी एस.बी (इंग्रजी) या सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी (बेडके),मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके),संस्थेचे उपाध्यक्ष मोदी सर तसेच नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी (बेडके),सर्व नियामक मंडळ सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सासवड ग्रामशिक्षण कमिटी सासवड सर्व ग्रामस्थ मंडळ सासवड माजी प्र. प्राचार्य श्री ठोंबरे सर, प्र.प्राचार्या सौ काकडे मॅडम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
No comments