राज्यात लॉकडाऊन काळात सायबरचे ४८८ गुन्हे दाखल; २६० लोकांना अटक
राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ४८८ गुन्ह्यांची नोंद कालपर्यंत झाली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे-
आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल
■ व्हॉट्सॲप- १९५ गुन्हे
■ फेसबुक पोस्ट्स – १९९ गुन्हे दाखल
■ टिकटॉक व्हिडिओ- २६ गुन्हे दाखल
■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ९ गुन्हे दाखल
■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे
■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ५५ गुन्हे दाखल
■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २६० आरोपींना अटक.
■ १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश
■ पुणे शहरातील चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्याची नोंद
मुंबईतील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या २९ वर
■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या धार्मिक भावना दुखावून दोन धर्मात तणाव तयार होईल अशा आशयाचा मजकूर असणारी वक्तव्ये मीडियावर व्यक्त केली होती त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून ,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.
No comments