13 जणांना आज दिला डिस्चार्ज; 213 जणांचे नमुने पाठविले तपासणीला तर 167 जणांचे नमुने आले निगेटिव्ह
सातारा दि. 19 ( जि. मा. का ) : विविध रुग्णालयांमध्ये व कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असणाऱ्या 13 जणांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
यामध्ये सातारा तालुक्यातील देगाव येथील 60 वर्षीय पुरुष, कुसवडे येथील 58 वर्षीय पुरुष, कुसबुद्रुक येथील 16 वर्षीय तरुण, कुसवडे (आसनगाव) येथील 47 व 19 वर्षीय महिला.
वाई तालुक्यातील 30 वर्षीय महिला, सोमेश्वरवाडी येथील 68 वर्षीय महिला,वेरुळी येथील 46 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगा व 26 वर्षीय महिला.
फलटण तालुक्यातील बरड येथील 55 वर्षीय महिला,
जावली तालुक्यातील भणंग येथील 40 वर्षीय महिला, जावली येथील 55 वर्षीय महिला,
213 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 30, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 41, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 18, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 19, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 6, शिरवळ येथील 19, रायगाव येथील 6, पानमळेवाडी येथील 14, मायणी येथील 15, महाबळेश्वर येथील 3, पाटण येथील 5, दहिवडी येथील 37 असे एकूण 213 जणांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत
167 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 167 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
00000
No comments