मराठा समाजाची बदनामी थांबवा नाहीतर जशास तसे उत्तर दिले जाईल मराठा क्रांती मोर्चाचा इशारा,प्रांत व उपविभागीय पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन
फलटण (प्रतिनिधी) - पिंपरी चिंचवड व नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला तसेच आमच्या माता भगिनींना सोशल मीडियावर अपशब्द वापरून असे मेसेज व व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही आमच्या भाषेत त्यांना उत्तर देऊ अशा आशयाचे निवेदन मराठा क्रांती मोर्चचे वतीने प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहेत.
हे घाणेरडे मेसेज व व्हिडीओ ज्या तेढ निर्माण करणाऱ्या लोकांनी टाकले आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडीओ तात्काळ काढून टाकण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान काही लोक दोन्ही समाजात तेढ निर्माण करीत आहेत. त्यांना पोलिसांनी कायदेशीर समज द्यावी अन्यथा कायदा व सुव्यवस्था बिघडलेस शासन जबाबदार राहील वरील दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. त्या बाबत झालेल्या घटनेचा व समाजाचा संबंध नाही तो वयक्तिक वादातून घटना घडली का इतर कारणाने घडली या बाबत पोलिस तपास करीत आहेत. तसेच आमचा न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे.
आपल्या देशात लोकशाही आहे.तथापि न्याय व्यवस्था आपलं काम करीत आहे. या दोन्ही गोष्टींचा पोलिस प्रशासन तपास करीत आहे. आमचा पोलिस प्रशासन व न्याय देवता या दोन्ही गोष्टींवर विश्वास आहे.मात्र मराठा समाजाला टार्गेट करून काही समाजकंटक समाज व आमच्या महिला भगिनींना अपशब्द वापरत सोशल मीडियावर हे मेसेज व व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करीत आहेत. अशा समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊन या समाजकंटकांचा बंदोबस्त करू असा इशारा त्या लोकांना देत आहोत.
वेळीच राज्य सरकार व गृह विभागाने अशा पोस्ट शेअर करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आम्ही मराठा समाजाच्या वतीने करीत आहोत.
No comments