Breaking News

फलटण शहरात कोरोनाचे 2 रुग्ण




फलटण (दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा ) - फलटण तालुक्यातील कोरोना बाधीत व्यक्तींचा  आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असतानाच आज फलटण शहरामध्ये पहिले दोन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. रविवार पेठ फलटण येथील  महिलेची मरणोत्तर कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.  तर मंगळवार पेठ फलटण येथे  62 वर्षीय सारी पुरुषाची चाचणी पॉझिटिव्ह आली  असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.

फलटण तालुक्यात कोरोना रुग्णांचे अर्धशतक पूर्ण केले असतानाच आज शहरांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे,  सोलापूर वरुन रविवार पेठ, फलटण येथे आलेली 70 वर्षीय महिलेची  मृत्यूपश्चात तपासणी करून तिचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता, चाचणीचा रिपोर्ट आज कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर तळेगांव पुणे येथून मंगळवार पेठ फलटण येथे आलेल्या 62 वर्षीय सारी पुरुषाची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.


No comments