Breaking News

फलटण येथील सारी व कोविड बाधित 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

 

       सातारा दि. 23 ( जि. मा. का ) : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे दाखल असणारा फलटण येथील सारी व कोविड बाधित 62 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

101 नागरिकांचे  रिपोर्ट आले निगेटिव्ह

        काल रात्री उशीरा एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड  यांच्याकडून 101 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे कळविण्यात आले आहे.

आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 844 झाली असून कोरोनातून बरे झालेल्या 668 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 137 इतकी झाली आहे तर   शासनाच्या नियमाप्रमाणे मृत्यू पश्चात चाचणी करायची नसल्यामुळे कराडच्या कृष्णा हॉस्पिटल मध्ये दि.19 जून रोजी  मृत्यू झालेला. मृत्यू पश्चात बाधित निघाला होता. तो बाधित मृत्यू मधून कमी केल्यामुळे आता बाधित मृत्यूची संख्या 39 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गडीकर यांनी दिली.

0 0 0 0

Write
Reply
Forward

No comments