Breaking News

1200 किलो मांस व जनावरांची वाहतूक करत असताना पोलिसांची कारवाई


जप्त केलेल्या बलेरो पिकप, 407 टेम्पो व आरोपींसह पोलिस  उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे व पोलीस अधिकारी, कर्मचारी

फलटण (दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा) - 2 बलेरो पिकप व एक 407 टेम्पो यामधून सुमारे 1200 किलो वजनाचे मांस व दोन जर्सी जनावरे यांची वाहतूक करत असताना पोलिसांनी कारवाई करून मुद्देमाल ताब्यात घेऊन  आरोपींवर गुन्हा दाखल केला.

फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 22 जून 2020 रोजी रात्री 02:30 वाजन्याच्या सुमारास कुरेशीनागर फलटण येथे  इरफान चांद कुरेशी रा. कुरेशी नगर फलटण ता. फलटण यांनी बोलेरो पिकप क्रमांक एम एच 14 -AS-3686 व टाटा 407 गाडी क्रमांक एम एच 12 CT 9804  मधून आसिफ पीर महंमद शेख , सुफियान रफिक बागवान यांचे मार्फत सुमारे 1200 किलो जनावरांचे मांस व बोलेरो पिकप गाडी क्रमांक एम एच/ 11- BL-1629 मधून दोन जिवंत जर्शी जनावरे याची अज्ञात चालक यांचेमार्फत वाहतूक करीत असताना आढळून आल्याने, फलटण शहर पोलीस स्टेशन कडून संबंधितावर कारवाई करत सुमारे 15 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून, आरोपींवर भा दं वि स तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमलामध्ये 2 बलेरो पिकप, एक 407 टेम्पो, 1200 किलो मांस, 2 जर्सी जनावरे , 2 मोबाईल यांचा समावेश आहे
गुन्ह्याचा अधिक तपास पो नि राऊळ हे करीत आहे.

No comments