Breaking News

श्रीमंत लक्ष्मीदेवी मालोजीराजे नाईक निंबाळकर राणीसाहेब यांच्या जयंतीनिमित्त मुधोजी महाविद्यालयात विनम्र अभिवादन!

Humble tributes to Mudhoji College on the birth anniversary of Shrimant Lakshmidevi Maloji Raje Naik Nimbalkar Ranisaheb!

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १८ : श्रीमंत लक्ष्मीदेवी मालोजीराजे नाईक निंबाळकर राणीसाहेब यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दिनांक.१७ नोव्हेंबर २०२६ रोजी मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.पी.एच. कदम यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात राणीसाहेबांच्या स्मृतींना उजाळा देताना प्रा. मच्छिंद्र  वाघमोडे म्हणाले, 

    श्रीमंत लक्ष्मीदेवी मालोजीराजे नाईक निंबाळकर राणीसाहेब यांचे व्यक्तिमत्त्व धार्मिक, आध्यात्मिक, लोककल्याणकारी आणि पुरोगामी विचारांचा सुंदर संगम होते. धर्म आणि अध्यात्म यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन केवळ कर्मकांडापुरता मर्यादित नसून मानवी मूल्ये, सेवाभाव, परोपकार आणि समाजहित यांना प्राधान्य देणारा होता. समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कल्याणाची जाणीव, स्त्रियांच्या सन्मानाचा आणि उन्नतीचा विचार तसेच सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून अधोरेखित होते. स्त्रीशिक्षण, स्त्रीसन्मान आणि स्त्रीउद्धाराच्या विचारांशी सुसंगत असलेली त्यांची प्रतिमा समाजासाठी प्रेरणादायी आहे. परंपरेचा आदर राखतानाच प्रगतिशील विचारांची कास धरणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व फलटणच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेतील स्मरणीय ठेवा आहे.त्यांच्या लोककल्याणकारी आणि पुरोगामी विचारांचा वारसा नव्या पिढीला प्रेरणा देत राहील.असे सांगितले.त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला सर्वांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.या कार्यक्रमास महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. आर.वाय.गायकवाड,ग्रंथपाल प्रा.आनंद पवार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे  आभार प्रदर्शन प्रा.मच्छिंद्र वाघमोडे यांनी करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

No comments