Breaking News

लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्कमध्ये चिमुकल्यांसोबत बालदिनाचा आनंदोत्सव!

Children's Day celebration with the little ones at Lions Children's Health Park!

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.  १४ नोव्हेंबर २०२६ : लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने माळजाई मंदिर व उद्यान परिसरातील लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्क येथे आज बालदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

    बालदिनाचे औचित्य साधून पार्कमध्ये खेळण्यासाठी आलेल्या लहान मुलांना चॉकलेट, बिस्किटे व विविध फळांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. मुलांच्या निरागस हास्याने आणि उत्साहाने संपूर्ण परिसर आनंदमय झाला.

    लहान मुलांचे आरोग्य, आनंद आणि सर्वांगीण विकास यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. मुलांना आनंददायी वातावरण उपलब्ध करून देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.

    यावेळी फलटण लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन श्री. रणजित बर्गे, सचिव लायन श्री. प्रमोद निंबाळकर, खजिनदार लायन श्री. दिलीप शिंदे, लहान मुले, पालकवर्ग तसेच माळजाई मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आमच्या समाजसेवेचे खरे समाधान!* या भावनेतून लायन्स क्लब ऑफ फलटणने बालदिनाचा हा आनंदोत्सव साजरा केला.

No comments