Breaking News

मुधोजी महाविद्यालयात ‘उद्योजकता विकास’ सेमिनार उत्साहात संपन्न

‘Entrepreneurship Development’ seminar concluded with enthusiasm at Mudhoji College

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील संगणक व व्यवस्थापन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘उद्योजकता विकास’ विषयावरील सेमिनार उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, स्वयंरोजगार आणि व्यवसायिक कौशल्ये विकसित व्हावीत, हा सेमिनारचा प्रमुख उद्देश होता.

    या सेमिनारसाठी डॉ. धनंजय देशपांडे  तसेच श्री. महेश साळुंखे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योजक म्हणजे कोण, नवीन व्यवसायाची कल्पना कशी शोधावी, स्टार्टअप सुरू करताना येणारी आव्हाने, शासनाच्या विविध योजना, बँक कर्ज, मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन आणि यशस्वी उद्योजक होण्यासाठी लागणारे गुण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

    सेमिनारचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांशी साधलेला प्रत्यक्ष संवाद. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यवसाय कल्पना मांडल्या, प्रश्न विचारले आणि उद्योजकतेच्या क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत माहिती घेतली. केवळ नोकरीच्या मागे न लागता, स्वतःचा व्यवसाय उभा करून इतरांना रोजगार देणारा उद्योजक व्हा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
सेमिनारच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम हे उपस्थित होते. तर कार्यक्रमास आयक्यूएसी समन्वयक *डॉ. टी. पी. शिंदे* यांची विशेष उपस्थिती होती. संगणक व व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख प्रा. एस. एस. लामकाने व सर्व शिक्षक वर्ग यांची यावेळी उपस्थिती होती.

    सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी नोकरीसोबतच उद्योजकतेकडेही वळणे काळाची गरज असून, आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया यासारख्या उपक्रमांमुळे उद्योजकतेला मोठी संधी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. विद्यार्थ्यांकडून या सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

No comments