गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना तडीपार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २१ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून पार पडावा, यासाठी फलटण शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला वेग दिला आहे. गणेशोत्सव तसेच अन्य उत्सवांच्या काळात यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या ४३ जणांना फलटण शहर पोलीस ठाणे व तालुका हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३(२) अन्वये हा आदेश देण्यात आला आहे.
ही मनाई २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. उत्सव काळात संबंधितांकडून कोणतेही गैरकृत्य घडू नये आणि सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. हद्दपार करण्यात आलेली नावे पुढील प्रमाणे विशाल पांडुरंग माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), देविदास बापु माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), संपत भरत माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), अजय पांडुरंग माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण) रंगराव भरत माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), अमर राजु माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), नेताजी प्रकाश माळीं (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), प्रकाश काळुराम माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), अमोल आकाराम मोरे (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), रमेश संजय माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), अजय रघुनाथ माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), करण संजय सरगर (खाटीकगल्ली, फलटण), मंगेश किसन बेंद्रे (खाटीकगल्ली फलटण), रोहन महेश सरगर (खाटीकगल्ली फलटण), किशोर धनराज पवार (कसबापेठ फलटण), धनराज लक्ष्मण पवार (कसबापेठ फलटण), अमित अनिल कदम (रविवारपेठ फलटण), राहुल बजरंग पोतेकर (रविवारपेठ फलटण), सुरज हिंदुराव कदम (रविवारपेठ फलटण), बजरंग राजेंद्र खलाटे (रविवारपेठ फलटण), वरद विद्याधर भोईटे (नरसिंहचौक फलटण), प्रविण तुळशीराम नाळे (जाधववाडी फलटण) किरण कुमार घोरपडे (ढवळ फलटण) अजय संभाजी भोसले (शेलारवस्ती ठाकुरकी) अभिजित जयवंत खराडे (पवारगल्ली, फलटण) सचिन जयवंत खराडे (पवारगल्ली, फलटण) महेश विलास आवारे (मंगळवारपेठ, फलटण) हेमंत दत्तात्रय शिरतोडे (रविवारपेठ, फलटण) शिवाजी जगन्नाथ डोईफोटे (नवामळा ठाकुरर्की) बिलाल रफिक कुरेशी (कुरेशीनगर, फलटण) झिशान ऊर्फ दिशान इमाम बेपारी ऊर्फ कुरेशी (कुरेशीनगर, फलटण) आबु ऊर्फ अल्ताब अफसर कुरेशी, (कुरेशीनगर, फलटण) मुबारक हनिफ कुरेशी, (कुरेशीनगर फलटण) शाहरुख जलील कुरेशी (कुरेशीनगर फलटण) अजिम शब्बीर कुरेशी (कुरेशीनगर फलटण) शंकर रामराव जुवेकर (महतपुरापेठ फलटण) अजय संजय जाधव (महतपुरापेठ फलटण) यांचा सामावेश आहे.
दरम्यान, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये १,४७० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच आणखी एका व्यक्तीविरुद्ध तडीपार प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून बिएनएस कलम १२६ अन्वये ९४, कलम १२९ अन्वये ३, प्रोव्हीजनल अॅक्टनुसार ७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये २ आणि कलम १०२ अन्वये ९ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध घटकांशी समन्वय साधण्यासाठी ५ शांतता समिती बैठका, ७ पोलीस मित्र बैठका, १० पोलीस-नागरिक समन्वय बैठका आणि १२ अन्य विभागांच्या समन्वय बैठका, अशा एकूण ३४ बैठका घेतल्या आहेत. या बैठकींमध्ये गणेश मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिकांना उत्सव काळात शांतता, सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घनशाम बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

No comments